Friday, October 4, 2019


नांदेड उत्‍तर विधानसभा स्विप कक्षामार्फत
 मतदान संकल्‍पपत्र, कविता वाचन संपन्न
नांदेड दि. 4 :- 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्‍थापन स्विप कक्षामार्फत 3 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रतिभा निकेतन हायस्‍कूल नांदेड येथे गटशिक्षणाधिकारी आर एल आडे, श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी, दत्‍तात्रय झरीवाड यांनी भेट देवून विद्यार्थ्‍यांकडून मतदार जनजागृती कविता वाचन करुन घेतले. तसेच मतदान जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांमार्फत त्‍यांचे पालक/ परिचीत व्‍यक्‍ती यांचेकडून मतदान करण्याबाबतचे संकल्‍पपत्र भरून घेण्‍यात आले. याप्रसंगी शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती माडेकर व सर्व शिक्षकांनी मतदान करण्‍याचा संकल्‍प करुन कार्यक्रम आयोजनासाठी आवश्‍यक सहकार्य केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...