Thursday, September 5, 2019


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना
नियोजन, सातत्य महत्वाचे
-         प्रा. डॉ. नितीन दारकुंडे
नांदेड, दि. 5 :-  स्पर्धा परीक्षेला सामोर जाताना विद्यार्थ्यांनी सातत्य नियोजनपूर्वक अभ्यास  केल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. नितीन दारकुंडे यांनी केले. ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत दरमाह 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी श्रीमती आशालता गुट्टे, सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा ग्रंथालय धिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांना श्रीमती गुट्टे यांनी मराठी सिद्धार्थ गायकवाड यांनी इंग्रजी या विषयावर अभ्यासपर्ण  असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी करुन दिला. तर सुत्रसंचालन आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुव, खंडेलोटे , कोडिंबा गाडेवाड यांनी सहाय्य केले.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...