हमीदराने कापूस खरेदीसाठी
भोकर, तामसा येथे केंद्र सुरु
नांदेड दि. 21 :- हमीदराने कापुस खरेदी
करण्यासाठी नांदेड विभागात भोकर व तामसा येथे केंद्र सुरु करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी
कापूस विक्री करतांना सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या
पानाची सुसप्ष्ट छायांकित प्रत सोबत आणावी, असे आवाहन कापुस पणन महासंघाचे विभागीय
व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.
हंगाम 2018-19 मध्ये कापूस पणन महासंघाची
नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून राज्याचे मर्यादेत हमी दराने कापूस खरेदी
करण्यासाठी झाली आहे. कापुस पणन महासंघाद्वारे संगणकीय कार्यप्रणाली विकसीत केली
असून याद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम थेट त्यांच्या आधार
कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री
करतांना येणाऱ्या प्रतिनिधी किंवा स्वत:सोबत शेतकऱ्यांचे नाव असलेला सातबारा
उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची सुसप्ष्ट छायांकित प्रत सोबत
आणावी, असेही आवाहन केले आहे.
000000
No comments:
Post a Comment