रेशीम शेतीसाठी महाराष्ट्राचा गौरव
नांदेड दि. 12 :- महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगीरीसाठी महाराष्ट्राला उ्द्योन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. केंद्रीय रेशीम मंडळाने दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात रेशीम संचलनालयाचा गौरव करण्यात आला. सदरचा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला.
राज्यात तसेच जिल्हयात नगदी पिक म्हणुन शेतक-याकडुन रेशीम शेतीला पसंती मिळत आहे. त्यामुळेच उदिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर तुती लागवड होत आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात सन 2019-20 साठी 400 एकरचा लक्षांक असतांना शेतक-यांनी 1 हजार 600 एकरची नोंदणी केली आहे, अशी माहिती
नांदेडच्या जिल्हा रेशीम कार्यालयाने दिली आहे.
00000000
No comments:
Post a Comment