Tuesday, February 12, 2019


        ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स) शिबीरास मिळाला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ईपिलेप्सी फाऊडेशन मुंबई व श्री. गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर, व वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ऐ.पी. वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० फेब्रुवारी २०१९ घेण्यात आलेल्या  ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स/आकडी) शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदरील शिबिरात तज्ञ न्युरोलॉंजिस्ट  डॉ. निर्मल सूर्या व त्यांची टीम यांच्यामार्फत एकूण ३८७ रुग्णांची मोफत  तपासणी करण्यात आली त्यापैकी ४१ रुग्णांची ईईजी चाचणी, २८ रुग्णांची  फिजीओथेरपी, २० रुग्णांची स्पीच थेरपी, व २८ रुग्णांचे समुपदेशन  करण्यात आले.
तसेच रुग्णांना या उपचार पद्धतीसह औषधांचा मोफत लाभ देण्यात आला. सदरील शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एन. हजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. शिरसीकर, डॉ. लोकडे, डॉ. माने, डॉ कुलदीपक, डॉ. सोनकांबळे, यांनी  ईपिलेप्सी फाऊडेशन टीमच्या तज्ञ डॉक्टरांशी समन्वय साधून शिबिराचे नियोजन केले. व सदरील नियोजनाप्रमाणे प्रभारी अधीसेविका एस.एस.चरडे, परीसेविका एस. बी. राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  समन्वयक अनिल कांबळे, अर्थसंकल्पीय व वित्त अधिकारी दत्ता सवादे, व समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.                                                   


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...