सोमवारी
लोकशाही दिन
नांदेड दि. 31 :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही
दिननसोमवार 4 फेब्रुवारी 2019 रोजी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,परिसर नांदेड येथे लोकशाही दिन दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत आयोजीत केला आहे.
यादिवशी महसूल, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, सहकार, कृषी विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाकडे
लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय
परिसरातील बचत भवन येथे
उपस्थित राहतील. निवेदनाच्या नोंदणीला सुरुवात दुपारी 12 वाजेपासून होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर / निवेदनावर म्हणणे ऐकुण घेण्याच्या
कामास सुरुवात करण्यात येईल.
लोकशाही दिनामध्ये अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याचे निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात
असावा (नमुना प्रपत्र 1 ते 1 डड), तक्रार
/ निवेदन वैयक्तीक स्वरूपाची असावी, अर्जदाराचे विहित
नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतिमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पाठविणे
आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर 1 महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय
नांदेड येथे अर्ज करता येईल. अर्ज न स्विकारण्याचे निकषात न्याय प्रविष्ठ प्रकरणे
राजस्व / अपिल्स सेवाविषयक, अस्थापना विषयक
बाबींचा समावेश असलेली. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर
दिलेले आहे, देण्यात येणार आहे, तक्रार निवेदने
वैक्तीक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजून घेऊन त्या शक्य तीतक्या लवकरात लवकर सोडण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे. अशा
प्रकरणाची पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती
देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment