Thursday, January 31, 2019


मागेल त्याला शेततळे योजनेची
टंचाई काळात शेतकऱ्यांना झाली मदत
योजनेत सहभागी व्हावे - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चलवदे

     
नांदेड दि. 31 :- मागेल त्याला शेततळे ही योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असू शासन निर्णय  17 फेब्रुवारी 2016 नुसार नांदेड जिल्हयात ही योजना सुरु करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेमोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
या योजनेत शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती अनिवार्य असून शेतकऱ्यांनी त्यांची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेे आहेत.
जिल्ह्यात वार्षीक पाऊसाचे सरासरी प्रमाणे 955 मि.मि. इतके अस पावसाच्या अनियमिततेमुळे शेती करताना अडचणी, घटणारे पिकांचे उत्पादन तसेच दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी  मागेल त्याला शेततळे योजना ही लाभदायक ठरत आहे. या शेततळयांमुळे पावसाच्या पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचन, फलोत्पादन पुरक कृषि उद्योगासाठी (मत्स्योत्पादन) होतो. शेततळे कार्यक्रमाचा विविध विस्तार योजनांशी सांगड घालून संरक्षित सिंचनामुळे पिकाचे उत्पादना वाढ होते.
नांदेड जिल्ह्यास 4 हजार शेततळयाचे लक्षांक देण्यात आले असून आज आखेरीस 2 हजार 44 शेतकऱ्यांनी शेततळे या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.
            देगलूर तालुक्यातील रामपुर प.शहापुर येथील विजय पुताजी कोकणे या शेतकऱ्याने मे 2018 मध्ये शेततळयाचा लाभ घेतला. खरीप हंगामामध्ये या शेतकऱ्याने 5 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतले अस जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या 20 ते 25 दिवस पावसाच्या खंड कालावधी शेततळयातून सोयाबीन पिकास एक संरक्षीत सिंचन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातील घट थांबवता आली. या शेतकऱ्यांने  त्यांच्या उत्पन्ना 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे सांगितले. तसेच शेततळयाला लागुन असलेल्या बोअरवेलच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे श्री. कोकणे यांनी सांगितले.
या योजनेतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळयाची मागणी करता येते. या जास्तीतजास्त 30 बाय 30 बाय 3 मीटर या आकारमानाचे कमीतकमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येते. इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारात किमान 20 बाय 15 बाय 3 मीटर आकारमानाचे शेततळे घेता येते. आकारमानानुसार कमाल अनुदान 50 हजार रुपये इतके असून अनुदानाची रक्कम काम पूर्ण झाल्यावर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...