Thursday, December 27, 2018


कृषि व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 26 :-  शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याकरिता उत्पादित कृषि मालासाठी शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करणे, कृषि मालाचे मुल्यवर्धन करणे, कृषि प्रक्रिया उद्योगात वृध्दी करणे गरजेचे आहे. या उद्देशाची पुर्तता करण्यासाठी सहकार विकास महामंडळामार्फत राज्यातील विविध कार्यकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे सभासद / वैयक्तीक शेतकरी यांच्यासाठी "Agri Business Start-up" प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण  14 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत सहकार प्रशिक्षण संस्थान नळस्टॉप पुणे येथे आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी 30 प्रशिक्षणार्थीची निवासी बॅच राहणार आहे. याकरिता प्रती प्रशिक्षणार्थी  8 हजार 500 रुपये + (18 टक्के GST रु.1,530/-) असे एकूण 10 हजार 30 रुपये शुल्क निर्धारीत करण्यात आले आहे.  त्यामुळे हे प्रशिक्षणाचा लाभ जास्तीतजास्त संबंधित संस्था व इच्छुक उमेदवारांनी घेणेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड प्रवीण फडणीस यांनी आवाहन केले आहे.
या प्रशिक्षणाचा उद्देश व निकष तसेच प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणीबाबतचा अर्जचा नमुना याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांचे वेबसाईट www.mahamcdc.com वरून अधिक माहिती घ्यावी.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...