Thursday, December 27, 2018


भारतनेट प्रकल्‍पाच्‍या दुसऱ्या चरणास प्रारंभ
ग्रामपंचायतीना मिळेल उच्‍च प्रतीची इंटरनेट जोडणी

           
नांदेड, दि. 27 :- केंद्र सरकारच्‍या भारतनेट या उपक्रमाच्‍या दुस-या टप्‍याची सुरूवात नांदेड जिल्‍ह्यातील  लोहा तालुक्यातील मौ. किरोडा येथे आज तहसिलदार विठ्ठल परळीकर यांचे हस्‍ते करण्‍यात आल.
भारतनेट-महानेट प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांचेमार्फत राबविण्‍यात येत असून या प्रकल्‍पाव्‍दारे नांदेड जिल्‍हातील 11 तालुक्‍यातील 964 ग्रामपंचायतीना ऑप्‍टीकल फायबर नेटवर्क ब्रॉडबॅडने जोडले जाणार आहेत. ग्रामस्‍तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देउन त्‍यांना जगाशी जोडण्‍याच्‍या उद्देशाने केंद्र सरकारव्‍दारे हा उपक्रम सुरु केला आहे.
प्रकल्‍पात तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्‍या पुढील प्रमाणे आहे: भोकर - 67, बिलोली - 73, देगलूर - 96, हदगाव - 125, हिमायतनगर - 52, किनवट - 134, लोहा - 118, माहूर - 63, मुदखेड - 51, मुखेड -127, उमरी–58. या 11 तालुक्यात 3 हजार 807 किमी अंतर केबल टाकून 964 ग्रामपंचायाती जोडण्यात येणार असून हे  काम जिल्‍ह्यात पूर्ण करण्‍यासाठी शासनाव्‍दारे स्‍टरलाईट या कंपनीची निवड केलेली आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास लोहा गटविकास अधिकारी प्रभाकर फाजेवड, विस्तार अधिकारी श्री. धर्मेकर, प्रकल्प प्रमुख कुलदीप जोशी, ज्ञानेश्‍वर रांजणे, सय्यद वाजीदअली, राजेश वाघमारे, असीम अलवी, व्‍यवस्‍थापक स्‍टेरलाईट कंपनी आदी मान्यवर तसेच किरोडा गावचे सरपंच देखिल या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्‍ताविक जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक निरज धामणगावे यांनी केले तर आभार पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सतीश चोरमाले यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...