Friday, December 14, 2018


  बस चालकांना रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन मार्गदर्शन

नांदेड, दि.14:- मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दि.22  नोव्हेंबर, 2018 रोजीच्या व्हीडीओ कॉन्फरन्सीमध्ये विविध बस चालकांना रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन मार्गदर्शन करण्याबाबत निर्देशीत केले होते. त्यानुसार या कार्यालयातील निर्देशानुसार नांदेड मधील मुख्य ट्रॅव्हल्स मालक जसे की शर्मा ट्रव्हल्स् खुराणा ट्रॅव्हल्स् इत्यादींना त्यांच्याकडे कार्यरत बस चालकांना रस्ता सुरक्षा सुरक्षा विषयक प्रबोधन मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यालयात सदर बाबतचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले.
            त्यानुसार दि.05 दि.06  डिसेंबर, 2018 रोजी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा मार्गदर्शन कक्षात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे शंभर बस चालकांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी उप प्रादेश्कि परिवहन अधिकारी श्री. अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनंत भोसले, श्री.अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सविता पवार, सहा.मोटार वाहन निरीक्षक श्री.गणेश तपकिरे, श्री. संजय पल्लेवाड यांनी उपस्थित बस चालकांना रस्ते अपघात टाळण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारी, चालकांच्या होणाऱ्या चूका तसेच आरोग्य विषयक सवयी याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी चालकांना रस्ते सुरक्षा विषयक चित्रफिती दाखविण्यात आल्या.
            नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या अर्जदारांचे कार्यालयातील सुरु करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा मार्गदर्शन कक्षात प्रबोधन करण्यात येते प्रबोधनपर चित्रफिती दाखवण्यात येतात.
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...