Friday, December 14, 2018


मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्याबाबत
परिवहन विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार
नांदेड, दि. 14 :- राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी मोटार वाहन कायदाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये परिवहन विभाग, शहर वाहतुक शाखा, तसेच महामार्ग पोलीस यांच्याद्वारे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये विना हेल्मेट वाहन चालविणे, विना लायसन्स वाहन चालविणे अतिवेगाने वाहन चालविणे, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, नशा करुन वाहन चालविणे,वाहन चालविताना माबाईलवर बोलणे, सिग्नल पाळणे इतर गुन्ह्या विरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व वाहन चालकांनी विधीग्राह्य कागदपत्रे वाहन चालवितांना सोबत बाळगावी तसेच दूचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.
            ज्या वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल त्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात एक तासाचे मार्गदर्शन बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे एक तासाचे समुपदेशन बंधनकारक करुन त्यानंतरच त्यांचा दंड घेतला जाणार आहे.
            पुढील गुन्हयासाठी वाहन चालकांचे लायसन्स तीन महिन्याकरिता निलंबित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सिग्नल पाळणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, नशा करुन वाहन चालविणे, जादा भार वाहतुक करणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे यावरही कारवाई केली जाईल.
              याद्वारे सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करावे व अपघातापासून आपला व इतरांचा बचाव कराव तसेच लायसन्स निलंबन होण्यापासून परावृत्त व्हावे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...