प्रेस नोट
नांदेड शिख
गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणूक 2018
मतदान प्रक्रिया सुरळीत
व शांततेत पार पडल्याबाबत.
जिल्हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दिनांक-26 नोव्हेंबर
2018 अन्वये नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या
तीन सदस्य निवडणूकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 28 डिसेंबर 2018 शुक्रवार
रोजी नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्मानाबाद,
परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील एकुण
71 मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. निवडणुकी दरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडला नाही.
सदर
निवडणूकीसाठी एकुण 26 मतदार निवडणूक लढवित आहेत. एकुण 12 हजार 714 मतदार होते. सर्वात
जास्त 8 हजार 207 मतदार नांदेड जिल्ह्यात होते तर सर्वात कमी मतदार कमी 4
मतदार उस्मानाबाद जिल्ह्यात होते. एकुण
मतदानाच्या 72.51 टक्के
एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपुर्ण मतदार क्षेत्रामध्ये एकुण 9
हजार 220 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामध्ये 4 हजार 888 पुरुष मतदार होते तर 4 हजार 332 स्त्री मतदार होते.
संपुर्ण
निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व प्राधिकृत
अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी हाताळली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्ताच्या उपाययोजना नांदेड
जिल्हा पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी व अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अक्षय
शिंदे यांनी केल्या.
नांदेड, औरंगाबाद, बीड,
जालना, लातुर, उस्मानाबाद,
परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,
अपर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, अतिरीक्त पोलीस अधिक्षक,
समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी काम केले. संबंधित
उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी क्षेत्रिय अधिकारी म्हणून
काम पाहिले. उपरोक्त सर्व अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ कर्मचारी यांनी निवडणूकीच्या
कामांचे सुव्यवस्थित नियोजन व प्रत्यक्षात अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात
योगदान दिले.
या
निवडणूकीची मतमोजणी सर्व तहसिल कार्यालयांच्या ठिकाणी व नांदेड तालुक्यात बहुउद्देशीय सभागृह, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे शनिवार 29
डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेपासून होणार आहे. तसेच सोमवार 31 डिसेंबर 2018
रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मतमोजणी संकलन व
तीन सदस्यांच्या निवडणूकीचा निकाल घोषित होणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड
यांच्यावतीने कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment