टंचाईच्या गावातील कामे तात्काळ पूर्ण करावीत
-
पालक सचिव एकनाथ डवले
बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद
कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा नियोजन
अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नांदेड पाटबंधारे मंडळाचे एस.
बी. सब्बीनवार, नांदेड पाटबंधारे विभाग आर.एम.देशमुख तसेच संबंधीत
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री डवले म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही
शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची तसेच प्रत्येक योजनांची कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण
करावेत. जिल्ह्यात जलयुक्त
शिवार अभियानांतर्गत विविध कामे झाली आहेत. मागेल
त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा ही योजना
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास
योजना (नागरी) , महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान , अमृत योजना,
जलयुक्त शिवार अभियान , महानरेगा , धडक विहीरी योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना व मुद्रा योजना, मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना म. ग्रा. र. वि. संस्था, नांदेड , दलित वस्ती सुधार योजना /
ठक्करबाप्पा योजना, महानगर पालिका क्षेत्रातील दोन वैशिष्ट्यपूर्ण पथदर्शक
प्रकल्प, बळीराजा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, जिल्ह्यातील कायदा व
सुव्यवस्था आदि विषयांचा पालक सचिव श्री डवले यांनी आढावा घेतला.
000000
No comments:
Post a Comment