माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर
नांदेड दि. 28
:- "माहिती अधिकार दिन" हा 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर
साजरा करण्यात येतो. "माहिती तंत्रज्ञानाचा- माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत
होणारा प्रभाव" या विषयावरील व्याख्यानात सहा. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी
अशोक जाजू यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली
या व्याख्यानाचे आयोजन उपजिल्हाधिकारी
(सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे
केले होते.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोंबर
2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवळी जाणीवपूर्वक उचलेल्या
पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमूख झाला आहे.
राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन
स्तरावरुन सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
श्री. जाजू यांनी या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर प्रशासनाच्या कारभारात कसा करावा याची माहिती दिली. आरटीआय
ऑनलाईन प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस अधीक्षक व जिल्हा
परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार नागरिकांनी ऑनलाईन
प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपील दाखल करुन शकतात. तसेच नांदेड जिल्हा
संकेतस्थळ www.nanded.gov.in वर माहिती अधिकार अधिनियम 2005
कलम 4 अन्वये प्रत्येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी
कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची 1 ते 17
मुद्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी
यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकाचे
निरसन करण्यात आले. शेवटी हिमायतनगरचे तहसिलदार डॉ. अशिष बिरादार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास प्रथम अपिलीय अधिकारी, जन
माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय ऑनलाईन संकेतस्थळाचे कामकाज
हातळणारे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment