जिल्ह्यात राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही सर्वेक्षण सुरु
नांदेड, दि. 14 :- राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय व्यवसाय
नोंदवही तयार करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे
काम सुरु झाले असून यामध्ये आस्थापनाचालक, परवानाधारकांकडून त्यांचा पॅन क्रमांक,
टॅन क्रमांक, आस्थापना क्रमांक, कर्मचारी संख्या याबाबतची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी
यांना देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी चं. प.
कोंडेकर यांनी केले आहे.
या सर्वेक्षणात कंपनी ॲक्ट 1956, फॅक्ट्री ॲक्ट 1948, शॉप ॲन्ड कमर्शीयल
इस्टॅब्लीशमेंट ॲक्ट 1948, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960, को-ऑपरेटिव्ह सोसायटी
ॲक्ट 1960, खादी ॲड व्हीलेज इंडस्ट्रीज बोर्ड, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज (डीआयसी)
या सात कायदयांतर्गत 31 मार्च 2015 पूर्वी नोंदणी झालेल्या आस्थापनांची माहिती संकलीत
केली जाणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment