नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्पात
जिल्ह्यातील 384 गावांची निवड
नांदेड, दि. 14 :- नानाजी कृषी देशमुख
संजीवनी प्रकल्पांतर्गत
नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात
384 गावांची निवड करण्यात
आली असून प्रथम टप्यात
अर्धापूर, किनवट, मुदखेड, देगलूर, कंधार, भोकर, उमरी, नायगाव या 8 तालुक्यातील
70 गावांची
निवड करण्यात आली आहे.
प्रथम टप्यात
64 ग्रामपंचायतींचा
समावेश असून 56 गावात 44 ग्राम कृषी
संजीवनी समिती स्थापन करण्यात
येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात
आले आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गावात
सोयाबेन
+ तूर आणि कापूस + उडीत
/ मूग हे प्रात्याक्षिकांचे आयोजन
करण्यात येऊन प्रात्याक्षिकांस लागणारे
बियाणे,
MAUS -१५८,
BDN - ७१६,
NH - ६१५ या वानाचे वितरण
करण्यात आले आहे. या 70 गावांमध्ये
एकूण 140 शेतीशाळेचे आयोजन करण्यात
येऊन,
शेतीशाळामार्फत पेरणी पूर्व व पेरणी
पश्चात शेतीशाळा घेण्यात आल्या
आहेत.
या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक
कंपनी यांचे बळकटीकरण व
सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे.

00000
No comments:
Post a Comment