Saturday, August 4, 2018


बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना
ऑनलाईन प्रमाणपत्र नोंदणीसाठी मुदतवाढ
संस्था चालकांसाठी सोमवारी बैठकीचे आयोजन  
नांदेड दि. 4 :- बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ गुरुवार 30 ऑगस्ट 2018 पर्यंत देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागांतर्गत सर्व संस्था चालकांची बैठक सोमवार 6 ऑगस्ट रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, भाग्यनगर कमानीचे आत नांदेड येथे दुपारी 3.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधीत संस्था चालकांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 41 अंतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबतचे प्रस्तावासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांचे स्तरावरुन करण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्र प्रस्तावाच्या छाननी पत्राची प्रत महिला व बाल विकास विभागाच्या womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर बातम्या व सूचना या सदराखाली उपलब्ध आहे. संस्थांनी यापुर्वी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत अशा संस्थांनी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित छाननी पत्रात नमूद त्रुटींची पुर्तता करुन त्रुटी पुर्तता अहवाल आयुक्त महिला व बाल विकास 28 राणीचा बाग पुणे 411 001 यांचेकडे हस्ते पोहोच किंवा पोस्टाने 30 ऑगस्ट 2018 पर्यंत पोहचतील या पध्दतीने सादर करावा. कोणत्याही संस्थांना त्रुटीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही आणि मुदतीनंतर कोणत्याही संस्थेचा त्रुटी पुर्तता अहवाल स्विकारला जाणार नाही .
ज्या संस्थांनी यापुर्वी प्रस्ताव सादर केले नाही अशा संस्था 30 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करु शकतील. अर्ज शासनाच्या womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल आहे. तसेच नविन अर्ज केलेल्या संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह महिला व बाल विकास आयुक्तालयास दि. 3 सप्टेंबर 2018 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 37 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन नांदेड दि.  10  जानेवारी :-    स्वामी विवेकानंदाच...