गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब
मंडळ निवडणूक
मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याबाबत बैठक संपन्न
नांदेड दि. 4 :- शीख गुरुव्दारा सचखंड
श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांना निवडून देण्यासाठी निवडणूक
प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम व पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी
करण्यासाठी 20 जुलै 2018 पासून मतदार नोंदणी कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी
सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने नांदेड तालुक्यातील
शिख धर्मीय मतदारांना मतदार यादीत अधिकाधिक नाव नोंदणीबाबत जनजागृती करणेच्या
अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे कक्षात बैठक
आयोजीत करण्यात आली होती.

मतदार नोंदणीचे फॉर्म 1 व त्याची
पोचपावती सर्व जिल्हाधिकारी सर्व तहसिलदार यांना पाठविले आहेत. संबंधित तहसिल
कार्यालयातून फॉर्म 1 घेऊन योग्य पध्दतीने भरुन, संबंधित तहसिल कार्यालयात / मतदार नोंदणी कक्षात दाखल
करावेत व पोच पावती घ्यावी. मतदार नोंदणीवरील प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीनंतर मतदार यादीतील आक्षेप आणि दुरुस्तीसाठी फॉर्म नमुना नं.- 2 व त्याची पोच
पावती सर्व जिल्हाधिकारी व सर्व तहसिलदार यांना पाठविले आहेत. मतदार
नोंदणीचा फॉर्म सोबत मतदार
ओळखपत्र / मतदार यादीचे मतदाराचे नाव असलेले पेज (1 जुलै 2018 च्या विधानसभेच्या
मतदार यादीचे) जोडावे. इतर धर्मातून शिख धर्म स्विकारला असल्यास अमृतपानाचे
प्रमाणपत्र जोडावे. परंतू सदरील बाबी
बंधनकारक नसून, केवळ
मतदारांची नोंदणी करणे सोपे होण्यासाठी आहेत. मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रमाची मुदत दि.18 ऑगस्ट 2018
रोजी पर्यंत आहे. सदर कालावधीतच मतदारांनी नाव नोंदणी करावयाची आहे. याबाबत सर्वच
नागरिकांनी विशेषत: शिख समाजातील नागरिकांनी जनजागृती करावी. तसेच जास्तीत जास्त
मतदारांनी यादीत नावे नोंदविण्यासाठी सर्वच नागरिकांनी प्रयत्न करावेत, अशा सुचना देण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, गुरुव्दारा
सचखंड बोर्डाचे अधीक्षक जी. एस. वाधवा, प्रशासकीय
अधिकारी डी. पी. सिंघ, जिल्हा व सत्र न्यायालयाचे
सरकारी अभियोक्ता अमरिकसिंघ वासरीकर, नगरसेवक गाडीवाले संदिपसिंघ शंकरसिंघ, श्रीमती गाडीवाले मनमितकौर नरेंद्रसिंघ, गाडीवाले
विरेंद्रसिंघ जगतसिंघ, श्रीमती
सोडी गुरप्रितकौर दिलीपसिंघ, श्रीमती प्रकाशकौर सुरजितसिंघ खालसा, नवाब गुरमितसिंघ
बरयामसिंघ, नायब तहसिलदार श्री नांदगावकर, मुगाजी काकडे, श्रीमती स्नेहलता स्वामी, गुरुव्दारा
सचखंड बोर्डाचे सदस्य, व्यवस्थापन समिती आदी
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment