Wednesday, July 18, 2018





सहस्त्रकुंडाचा मनमोहक धबधबा....
मराठवाडा-विदर्भ सिमेवरील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पैनगंगा नदीवरील मनमोहक सहस्त्रकुंड धबधबा नुकत्याच झालेल्या पावसामुळे भरुन वाहत आहे. अन् शेकडो वर्षापासून जनतेच्या मनाचा ठाव घेणारा प्रचंड आकर्षक असलेला हा धबधबा पर्यटकांचे आकर्षन ठरत आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी नांदेड ते किनवट मार्गावर इस्लापूर पासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर असणारा या धबधब्याच्या दोन्ही धारेतून सततधार पाणी वाहत असून लागणाऱ्या खोलीच्या तळाचा अंदाज घेत  साठलेल्या कुंडातून पाणी पुढे जात आहे. निसर्गरम्य अल्हादायक या सहस्त्रकुंडाच्या धबधब्यास पर्यटन प्रेमींनी भेट देण्याची संधी दवडू नये.  ( प्रकाशचित्रे : विजय होकर्णे, नांदेड )   



सहस्त्रकुंडाचा मनमोहक धबधबा....
नांदेड-किनवट मार्गावर इस्लापूर पाटी पासून 3 कि.मी. तर किनवटपासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर असणारा सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पैनगंगा नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला आहे. त्यामुळे पाणी खाली कोसळतांना वेगवेगळ्या धारा पडतात. नदीच्या अलीकडील पात्रात कोसळणाऱ्या धारेचा हा सर्वांत मोठा धबधबा असून मराठवाडा आणि विदर्भाचे सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील हा धबधबा खरोखरच नयनरम्य आहे. अंदाजे 30 ते 40 फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रौद्र रुप धारण करतो, ते पावसाळ्यात डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रुप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो. हा धबधबा अगदी 15 ते 20 फुटावरुन पाहता येतो. खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे आहे. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र 4 ते 5 अप्रतिम धबधब्याच्या धारा पहावयास मिळतात. त्या बाजूला जाण्यासाठी उमरखेड ते किनवट मार्गावरील बिटरगावहून आत जावे लागते. धबधब्याजवळ इस्लापूर वन विभागाच्यावतीने छोटी नर्सरी बगीचा उभारला असून पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सध्या येथे पर्यटकांनी सेल्फी काढण्याचा मोह टाळला पाहिजे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 




No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...