खासदार अशोकराव चव्हाण
यांनी घेतला
विविध विकास कामांचा आढावा
नांदेड, दि. 22:- नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण
यांनी आज एका बैठकीत विविध विकास कामांचा आढावा
घेतला.
विविध विषयांची आढावा बैठक येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन
भवन येथे संपन्न झाली. यावेळी खा. अशोकराव चव्हाण बोलत होते.
यावेळी सर्वश्री आमदार
श्रीमती अमिताताई चव्हाण,
आ. डि . पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण,
आ.
अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी
उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आर. बी. चलवदे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार
आदि. विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रीय पेयजल
योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे खा. चव्हाण यांनी निर्देश देवून
ते म्हणाले की, पिक विमा भोकर आणि
देगलूर या तालुक्याला समान मिळाला पाहिजे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. विविध
बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटप याबाबतचा आढावा घेण्यात आला. सांसद आदर्श
रोहिपिंपळगाव ता. मुदखेड आणि चांडोळा ता. मुखेड येथील कामांच्या प्रगतीचा आढावा
घेतला. आमदार आदर्श ग्राम जांभळी ता. भोकर येथील विकास कामांना गती देण्याबाबत
सुचित करण्यात आले. तसेच मुजामपेठ ता. नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361
मध्ये मिळणाऱ्या निधीबाबत नागरिकांच्या तक्रारीवर योग्य ती
कार्यवाही करावी. धनेगाव ता. नांदेड येथील व मुजामपेठ ता. नांदेड येथील मावेजाबाबत
योग्य कार्यवाही करण्यात यावी, असेही खा. अशोकराव चव्हाण
यांनी यावेळी सांगितले.
0000000
No comments:
Post a Comment