खरीप पीक कर्ज वाटपासाठी
"सुलक्ष कर्जवाटप
अभियान"
नांदेड दि. 24 :- शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपात अडचण
येऊ नये, कर्ज वाटप प्रक्रिया सोपी होण्यासाठी बँक व प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात
"सुलभ पीक कर्ज वाटप अभियान" राबविण्यात येत आहे. याबाबत नुकत्याच पार
पडलेल्या जिल्हास्तरीय बँक कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्देशही
दिले आहेत.
तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी
संस्था यांनी संबंधीत तालुक्यात मंडळनिहाय कर्ज वाटपाबाबत बँकांच्या मदतीने मेळावे
आयोजीत करुन पात्र शेतकरी व कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक
कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना खरीप
पीक कर्ज वाटप प्राधान्याने करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध
होण्यामध्ये अडचणी किंवा मागणी नंतर कर्ज उपलब्ध होत नसल्यास संबंधीत तालुका
उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment