मुलांची काळजी व संरक्षणासाठी
बालकल्याण समिती गठीत
नांदेड दि. 24 :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत
महिला व बालविकास विभागाच्या अधिसुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी बालकल्याण समिती
गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रा. निरंजनकौर स्वरुपसिंग सरदार हे असून
सदस्य ॲड गणेशलाल जोशी, श्रीमती सावित्री जोशी, डॉ. सुरेखा कलंत्री यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. या समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी आहे.
जिल्ह्यात शुन्य ते 18 वर्षे वयोगटातील
अनाथ, निराधार, निराश्रीत, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी बाल कल्याण
समिती कार्यरत आहे. तशी बालके आढळल्यास त्यांना बाल कल्याण समितीकडे उपस्थित करावे,
असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
धर्मपाल शाहू यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment