Sunday, April 8, 2018





 आता पासपोर्ट सुविधा नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होणार ;
नांदेडच्या पासपोर्ट कार्यालयाचे थाटात उद्घघाटन
नांदेड,दि.8:- आता पासपोर्ट सुविधा नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होणार ! नांदेड येथील नांदेडच्या पासपोर्ट कार्यालयाचे थाटात उद्घघाटन डाकघर येथे संपन्न झाले. डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र नांदेड कार्यालयाचे फित कापून उद्घाटन पोस्ट ऑफिस कार्यालयात खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. 
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, उपमहापौर विनय गिरडे-पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी (पुणे) अनंत ताकवाले, औरंगाबाद क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल प्रणवकुमार, विदेश मंत्रालायाचे संयुक्त सचिव (ओआयए-I) मनिष गुप्ता, स्थायी समितीचे सभापती शमी अब्दुला , प्रोटोकॉल प्रभारी जतिन पोटे आदि आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पासपोर्ट सुविधा ग्रामीण भागातील तसेच सामान्य नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होणार असल्याचेही  प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
यावेळी खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळामध्ये व कमीतकमी कागदपत्रांमध्ये नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिक विदेशात व्यवसायासाठी, नौकरीसाठी तसेच पर्यटनासाठी व हज यात्रेसाठी जिल्ह्यातील नागरिकांनाही परदेशात जाण्यासाठी या कार्यालयाची मदत होणार असल्याचे खा. श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी या आधी नागपूर येथे जावे लागत होते. आता ही सुविधा नांदेड शहरात कार्यालय सुरु केल्याने शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचा वेळ व पैश्यांची बचत होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.
पासपोर्ट कार्यालयातून चांगली तत्पर सेवा मिळून जास्तीत जास्त नागरिकांचे पासपोर्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे अनंत ताकवाले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत नरके यांनी केले .
****   

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...