Thursday, April 12, 2018


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
 नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 12 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ येथे दुपारी 3 वा. आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार हेमंत पाटील, आमदार     डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.     
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संतूक हंबर्डे, संजय कोडगे, चैतन्यबापू देशमुख, व्यंकटेश चाटे, प्रविण साले आदी पदाधिकारी उपस्थित होते.  त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण केले. उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानंतर हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे सायं 5.45 वा. आगमन झाले. त्यानंतर विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...