Saturday, March 24, 2018


 क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाने
नांदेड, दि. 24 :- क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. क्षयरोग व अतिगंभीर स्वरुपाचा मल्टी ड्रग रेजीस्टंट टि.बी. (एमडीआर) यावर वेळीच आवर घालण्यासाठी व निर्मुलनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे, प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्राच्या प्रांगणात आज संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाने बोलत होते.  
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शाम नागापूरकर, डॉ. कापसे , डॉ. प्रदीप जाधव, डॉ. दिपकसिंह हजारी , डॉ. साखरे, डॉ. श्रीरामे, उज्वला काळंबे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त भव्य रॅली मोंढा परिसराच्या टॉवरपासून गुरुद्वारा चौक-महाविर चौक-गांधी चौक-गांधी पुतळा मार्गक्रमण करीत जिल्हा क्षयरोग केंद्र सामान्य रुग्णालय परिसर नांदेड येथे विसर्जीत करण्यात आली. या रॅलीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.  
प्रास्ताविकात डॉ. नागापूरकर यांनी क्षयरुग्णांसाठी योजनांची माहिती देवून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांच्या नोंदी करण्याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी क्षयरोग जनजागृतीपर मार्गदर्शन केले. आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती केली.
याप्रसंगी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात ग्रामीण भागातील उत्कृष्ट सेवेबद्दल वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुत्रसंचालन डॉ. संदीप रायसोनी यांनी तर आभार वरिष्ठ पर्यवेक्षक अनिरुध्द भावसार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सौ. अनुपमा शिंदे, डॉ. शिवशक्ती पवार, जितेंद्र दवणे, ज्योती डोईबळे, पी.व्ही. कांबळे , संतोष दरगु, महेंद्र ऐगडे, श्री. कनकदंडे, श्री. चमकुरे, अजय सोळंके, संदीप मामीडवाड , गणेश इंगळे , राजू गायकवाड , योगेश धोंगडे आदिंनी संयोजन केले.    
 
00000     

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...