उद्यम
भांडवल निधी, सामुहिक प्रोत्साहन
योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 8 :- अनुसुचित
जाती व जमातीमधील औद्योगिक घटकांनी उद्यम भांडवल
निधी व सामुहिक प्रोत्साहन योजनेच्या इतर सवलतीचा
लाभ घ्यावा असे महाव्यवस्थापक, जिल्हा
उद्योग केंद्र, नांदेड यांनी आवाहन
केले आहे.
महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व जमातीच्या उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी लागणारा
तफावत निधी उपलब्ध करुन देण्याकरिता व्यवस्थापनासाठी आयडीबीआय कॅपिटल मार्केट ॲन्ड सिक्युरीटीज लिमिटेड (ICMS) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासाठी उद्योजकांनी www.idbicapital.com या संकेतस्थळावरुन माहिती
व अर्ज प्राप्त करुन घ्यावे. उद्योग संचालनालयाच्या di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन सुध्दा
लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment