Thursday, February 8, 2018


प्रलंबीत शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
 सादर करण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 8 :- काही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबीत आहे. ते देण्यासाठी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च अखेर ऑनलाईन अर्ज केली आहेत परंतू ज्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वी, इयत्ता 9 वी व दहावीत शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना इ. लाभ मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज शाळांनी पुनरुजीवित करण्यात आलेल्या संकेतस्थळावरुन शनिवार 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे पाठवावेत. त्यानंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंत आऊलवार यांनी केले आहे.  
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा आदी लाभ मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज, नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयानी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळावरुन गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.  
सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा निर्वाह भत्ता, विद्यावेतन आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18  साठी राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती महा-डीबीटी पार्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याने  सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeshol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थागित करण्यात आले होते, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...