राज्य
ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे
अध्यक्ष
अरुण देशपांडे यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष
(मंत्रीस्तरीय) तथा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे नांदेड दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 8 फेब्रुवारी
2018 रोजी मुंबई येथुन रेल्वेने सकाळी 8 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय
विश्रामगृहाकडे प्रयाण आणि राखीव. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अखिल भारतीय
ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा संबंधी अधिकारी,
शासकीय व अशासकीय सदस्य यांच्या समवेत ग्राहक संरक्षण या विषयावर जिल्हाधिकारी
कार्यालयात बैठक व चर्चा. दुपारी 3 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत पत्रकार परिषद.
सायं 5 ते 7 वाजेपर्यंत नांदेड येथील पिपल्स कॉलेज येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत
कार्यकर्त्यांसोबत बैठक व चर्चा. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व
मुक्काम.
शुक्रवार 9 फेब्रुवारी
2018 रोजी सकाळी 6 वा. वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment