Monday, February 12, 2018


पंचायत समिती रिक्‍त निर्वाचक गणाच्‍या पोट निवडणूकीसाठी  
मतदार यादी तयार करण्‍याचा कार्यक्रम

नांदेड, दि. 12:- राज्‍य निवडणूक आयेाग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी दि. 8 फेब्रुवारी, 2018 रोजीच्‍या पत्रान्‍वये राज्‍यातील जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांमधील रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
         त्‍यानुसार नांदेड जिल्‍हयातील कार्यक्रम कार्यान्‍वीत आहे. 66- सगरोळी पंचायत समिती निर्वाचक गण पंचायत समिती बिलोली  तसेच 83- मारतळा पंचायत समिती निर्वाचक गण, पंचायत समिती लोहा या रिक्‍त निर्वाचक गणाच्‍या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम कार्यान्‍वित आहे.
दि. 1 जानेवारी, 2018 या अर्हता दिनांक धरुन भारत निवडणूक आयेागाकडून दि. 10 जानेवारी, 2018 रोजी प्रसिध्‍द झालेली विधानसभेची मतदार यादी जिल्‍हा परिषद पंचायत समित्‍यामधील रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणूकीसाठी वापरण्‍यात येणार आहे. वरील मतदार यादी ग्राहय धरुन जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यामधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्‍या पोट निवडणूकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.    
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे दि. 28 फेब्रुवारी, 2018 , प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्‍याचा कालावधी दि. 28 फेब्रुवारी,2018 ते दि. 6 मार्च, 2018, प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणीत करुन प्रसिध्‍द करणे दि. 13 मार्च, 2018 ,मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्‍द करणे दि. 14 मार्च, 2018 .  
     महाऑनलाईनतर्फे तयार केलेल्‍या आज्ञावलीच्‍या मदतीने  प्रभागनिहाय मतदार यादीच विभाजन करण्‍यात येणार आहे. तरी संबंधीतांनी या बाबीची नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केलेले आहे.
***


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...