Tuesday, December 12, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 950 शेतकऱ्यांना
396 कोटी 42 लाख रुपयांची कर्जमाफी  
 नांदेड दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 2 हजार 331 शेतकऱ्यांच्या खात्यात 7 कोटी 6 लाख 22 हजार 986 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 24 हजार 380 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटी 13 लाख 93 हजार 901 रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 57 हजार 239 शेतकऱ्यांच्या खात्यात  359 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंची राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. फडणीस यांनी सांगितले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...