कर्जमाफी दिल्याबद्दल पिंपळगावात
शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
कर्जदार शेतकऱ्यांच्या
जीवनातील दु:खाचा भार
हलका करण्याचा प्रयत्न राज्य सरकाने
केला आहे. नांदेड
तालुक्यातील पिंपळगाव निमजे या गावातील शेतकरी विठ्ठल गंगाराम डक, गंगाधर धर्माजी डक
कर्जदाराची पत्नी श्रीमती ताराबाई गंगाधर डक, रामजी सिताराम डक (निधन) यांचा मुलगा
माधव रामजी डक, मधुकर व्यंकटराव पुंड यांची पत्नी श्रीमती सुनिता मधुकर पुंड , पार्वतीबाई
शंकरराव डक, दिलीप व्यंकटराव पुंड यांचे भाऊ प्रतापराव पुंड यांची मुलाखत घेण्यात
आली.
श्रीमती
सुनिता पुंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेडून 40 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे
कर्ज शासनाकडून पूर्णपणे माफ झाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सेवा
सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव पुंड यांनी सेवा सहकारी सोसायटीचे 30 लाभार्थी असून
20 शेतकऱ्यांचे 25 टक्के कर्ज माफ झाले असून तर 10 सभासदांना पूर्ण कर्ज माफी
मिळाली आहे. कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना
बेबाकी प्रमाणपत्र व नवीन कर्ज मिळणार असून सावकारी, आडतीवर पैसे उचलण्याची आता गरज
राहिली नाही. त्यांना कोणत्याही बँकेकडून शेतीसाठी कर्ज मिळू शकते. ही कर्ज माफी दिल्याबद्दल आनंद
व्यक्त केला.
श्रीमती
ताराबाई डक यांनी 40 हजार रुपयाचे तर गंगाधर डक यांनी 35 हजार रुपयाचे कर्ज सहकारी
सोसायटी नवा मोंढा नांदेड यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. परंतु, शेतीच्या नापिकीमुळे
हे कर्ज भरु शकलो नाही. राज्य शासनाकडून झालेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा
दिलासा मिळाल्याचे सांगितले.
विठ्ठल
डक या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून 40 हजार कर्ज घेतले होते त्यापैकी 25
हजारांचे कर्ज शासनाकडून माफ झाल्याचे सांगितले. मागील तीन वर्षापासून दुष्काळी
परिस्थती असल्याने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याने
शेतकरी आनंदी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. रामजी डक यांनी 9 हजार रुपये कर्ज घेतेले
होते. माधव रामजी डक (मुलगा) यांनी माझ्या वडिलांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ
केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
0000000
No comments:
Post a Comment