Monday, December 18, 2017

माळेगाव यात्रेतील पायाभुत सुविधांसाठी
6 कोटी 95 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता
 पालकमंत्री खोतकर यांचे मुख्यमंत्र्यांकडील पाठपुराव्यास यश  
नांदेड दि. 18 :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 16 डिसेंबर 2017 च्या निर्णयान्वये लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील भौतीक पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी 6 कोटी 95 लाख 36 हजार 181 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन त्यापैकी 5 कोटी 50 लाख रुपये जिल्हाधिकारी नांदेड यांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळेगाव यात्रेत विकास कामांच्या निधी संदर्भात घोषणा केली होती. या घोषणेनंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 
या पायाभुत विकास कामांमध्ये दर्शन मंडप, अन्न क्षेत्रालय, स्वच्छता गृह, प्रवाशी निवारा, यात्रा व मंदिर परिसरात सुविधा, गुराना पाणी पिण्यासाठी हौद, धोबीघाट, पार्कींग सोय, संरक्षण भिंत, कुस्ती मैदान, अंतर्गत रस्ते, यात्रा कमान गेट, वीज पुरवठा, पथदिवे, अग्निशमन यंत्रणा, बोअरवेल, पंपहाऊस, पाणीपुरवठा आदी विविध विकास कामांचा समावेश आहे. याबाबत स्थानीक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही पाठपुरावा केला होता. 
0000000


No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...