Tuesday, November 28, 2017

मुख स्वास्थ तपासणी मोहीम
1 ते 31 डिसेंबर कालावधीत
नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात मुख स्वास्थ तपासणी मोहीम 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधी साजरा करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची तोंडाची तपासणी केली जाणार आहे. तपासणी सर्व शासकीय, मनपा, न.पा दवाखाने येथे मोफत आहे. गावपातळीवर आशा, ए.एन.एम. व एम.पी.डब्लू. यांच्यामार्फत तपासणी करुन उपचारासाठी शासकीय दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. गरजू व्यक्तींनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गुंटूरकर यांनी केले आहे.
मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थाचे गमक आहे. त्याचप्रमाणे मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. तंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...