Tuesday, October 31, 2017

जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांना भावपूर्ण निरोप  

नांदेड दि. 31 :- जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने छोटोखानी सोहळ्यात श्री. दिलीप गवळी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.  
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यभार स्विकारलेले परभणी येथील जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी म्हणाले की, सर्वांचे सहकार्यातून नांदेड येथे चांगले काम करता आहे. याकाळात नांदेड जिल्ह्यातील घडामोडींशी समरस होऊन काम करता आहे. येथील विविध घटकांकडून खूप काही शिकता आले, ही खूप मोठी शिदोरी आहे,  ही खूप मोठी शिदोरी आहे.  ही आठवण कायम स्मरणात राहिल , असेही ते म्हणाले.    
यावेळी छायाचित्रकार विजय होकर्णे, दुरमूद्रणचालक विवेक डावरे, लिपीक सौ. अलका पाटील, के. आर. आरेवार, वाहन चालक प्रवीण बिदरकर, महमंद युसुफ मौलाना, अंधार कोठडी सहाय्यक अंगली बालनरस्या, आदिंनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनीही मनोगत व्यक्त करुन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   
दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या , उमाकांत जोशी, अब्दुल सत्तार, तौफिक मिर्झा, महंमद युसुफ , जयसिंग जाधव आदिंचीही यावेळी उपस्थिती होती.  सर्वांनी श्री. गवळी यांना शुभेच्छा दिल्या.   

****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...