जिल्ह्यात खत विक्री होणार आजपासून ऑनलाईन
नांदेड
दि. 31 :- खत खरेदी ऑनलाईन
पध्दतीने करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार
1 नोव्हेंबर
2017 पासून होणार आहे. जिल्हयातील 625 खत विक्रेत्यांना
पॉईट ऑफ सेल (पीओएस) मशीन
देण्यात आल्या असून खत खरेदी
करताना शेतकऱ्यांच्या बोटाचा
ठसा घेऊन आधारकार्ड नंबर
नोंदविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी
आपले आधारकार्ड दर्शवून रासायनिक
खताची खरेदी करावी तसेच
हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या
राबविला जाईल याबाबत सर्वांनी
सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी केले
आहे.
त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम
अदा करुन खत खरेदी
करायचे आहे. त्यानंतर ही नोंद
पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय
सर्व्हरवर नोंद होणार आहे.
त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे
अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना
देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा
दुरुपयोग टाळता येणार असून
राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून या पध्दतीचा
अवलंब करण्यात येणार आहे.
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून
मोठया प्रमाणात अनुदान देण्यात
येते. या अनुदानाचा दुरुपयोग
टाळावा तसेच शेतकऱ्यांना त्याचा
योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा
अवलंब करण्यात येणार आहे.
जिल्हयातील किरकोळ खत विक्रेत्यांना
तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत
प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या पध्दतीने खताची विक्री
करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी
करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे
आवश्यक आहे. कारण पीओएस
मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा
ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड
नंबर नोंद करायचा आहे.
त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण
झाल्यावर त्याला खताची विक्री
होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने
खताच्या खरेदीची रक्कम अदा
करायची आहे.
रासायनिक खत विक्री करीता
थेट लाभ हस्तांतरण (DBT) 1 नोव्हेंबर
2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात
राबविण्यात येणार आहे. त्या
अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे
अध्यक्षतेखाली रासायनिक
खत उत्पादक प्रतिनिधी, खत विक्रेते
यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या
आहेत.
नांदेड जिल्हयात 30 ऑक्टोंबर 2017
अखेर एकूण 546 ePos मशिनचे
वाटप विक्रेत्यांना करण्यात
आले असून त्यापैकी 499 ePos मशिन
कार्यरत झाले असून त्यापैकी
373 ePos मशिनवर रासायनिक खताचा साठा
नोंदविण्यात आला आहे. उर्वरीत
ePos मशिन मशिनवर 31 ऑक्टोंबर 2017
रोजी सायंकाळ पर्यंत रासायनिक
खताचा साठा नोंदविण्यात येईल.
या प्रकल्पाचे नोडल अधिकारी
तथा जिल्हाधिकारी नांदेड
यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.
तुकाराम मोटे, जिल्हा कृषि
विकास अधिकारी पंडीत मोरे
तसेच तालुका पंचायत समितीचे
सर्व कृषि अधिकारी यांच्या
मार्फत मागील 3 दिवासापासून खत विक्रेत्याकडील साठा ePos मशिनमध्ये नोंदविण्याचे काम
युध्द पातळीवर करण्यात येत
आहे.
00000
No comments:
Post a Comment