गोदावरी नदीकाठच्या गावांना
अतिदक्षतेचा इशारा
नांदेड
दि. 16 :- माजलगाव धरणाची पूर्णसाठा क्षमता 454 द.ल.घ.मी. असून पूर्ण संचय पातळी
431.80 मी. आहे. माजलगाव धरणामध्ये 10 ऑक्टोंबर रोजी 80 टक्के (387.00 द.ल.घ.मी.)
पाणीसाठा निर्माण झाला असून पाणीपातळी 430.90 मी. आहे. धरणाचा पाणलोट क्षेत्रात पावसाचा
जोर कायम राहिल्यास व धरणामधील पाणी आवक वाढल्यास धरणाचे पूर नियंत्रणासाठी कोणत्याही
क्षणी सिंदफणा नदी पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. धरणातून नदी पात्रात
पाणी सोडण्यात आल्यास नदीपात्रात जवळ जावू नये, तसेच पाण्यामुळे जीवीत या वित्त
हानी होऊ नये यासाठी गोदावरी नदी व सिंदफना नदीकाठचे गावांना अतिदक्षतेचा इशारा
कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ जि. बीड यांनी दिला आहे.
00000
No comments:
Post a Comment