Monday, October 2, 2017

  राष्ट्रपिता महात्मा गांधी , 
लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन
नांदेड, दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंहिसा दिनाची व स्वच्छतेची शपथ दिली.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहुन आदरांजली वाहिली. अव्वल कारकुन स्वाती अलोने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर आधारीत कार्याची माहिती दिली.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...