किटकनाशक विक्री केंद्राच्या तपासणीत
3 कोटी 75 लाख किंमतीच्या औषध विक्रीस बंदी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
शेतकऱ्यांनी किटकनाशके, तणनाशके फवारताना
दक्षता
घ्यावी
किटकनाशके
फवारतांना विषबाधा होऊ नये
म्हणून शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. किटकनाशके
खरेदी, वाहतूक, हाताळणी, प्रत्यक्ष फवारणी व फवारणीनंतर
घ्यावयाची दक्षता याबाबत कृषि
विभागाने फ्लेक्स, बॅनर व माहितीपत्रके आदीद्वारे
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.
डोंगरे यांनी वैद्यकीय अधिकारी, किटकनाशक औषधी
कंपनी जिल्हा प्रतिनिधी, किटकनाशक विक्रेते
संघटना पदाधिकारी यांची जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी डॉ. टी.
एस. मोटे, जिल्हा
परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत
मोरे यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे. तसेच
अर्धापूर तालुक्यातील किटकनाशक
औषधी विक्री केंद्रास जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी प्रत्यक्ष
भेट देवून जनजागृती
अभियानाची पाहणी केली व विक्रेते, शेतकरी यांच्याशी
संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी
संतोष पाटील, कृषि विकास
अधिकारी पंडीत मोरे, मोहीम अधिकारी
विनायक सरदेशपांडे तसेच महसूल
व कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात अनाधिकृत बियाणे
विक्री केल्याचे एक प्रकरण, रासायनिक खत जादा
दराने विक्री व अप्रमाणित
रासायनिक खत विक्रीबाबत असे
एकूण 2 प्रकरणे तसेच मान्यता
प्राप्त नसलेली किटकनाशक औषधी
विक्री केल्याचे एक प्रकरण
अशा एकूण 4 प्रकरणात पोलीस
गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. तसेच 2 बियाणे व 17 खते
परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
किटकनाशकांची
सुरक्षित हाताळणी पोस्टरचे विमोचनही
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक
शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. गावपातळीवर
किटकनाशक औषधी फवारणीबाबत घ्यावयाची
काळजी संबंधी जनजागृती करण्यास त्यांनी सूचना
दिल्या.
कृषि
व्यापारी संघटनेमार्फत जिल्हयातील
सर्व कृषि सेवा केंद्रावर
हे फ्लेक्स
लावण्यात आले आहेत. किटकनाशक
कंपनीमार्फत सुरक्षा किट वापराबाबतचे
प्रात्यक्षीत व किटचे वाटप
बी.ए.एस.एफ., सिजेन्टा इत्यादी कंपनी
मार्फत करण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे जिल्हयात बी.ए.एस.एफ कंपनीमार्फत
शेतकरी मेळाव्याचे आयोजन
करुन किटकनाशक फवारतांना घ्यावयाची काळजी
याबाबत माहिती देण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment