पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 4 :- मराठवाडा
मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आयोजित बैठकीत सर्व
संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेतला.
या बैठकीस जिल्हा
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी
संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तसेच क्रीडा, शिक्षण, पोलीस,
मनपा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 17 सप्टेंबर
रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा. माता
गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात येणार आहे. सर्व
विभागांना नेमुन देण्यात आलेली कामे यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडावीत, असे
निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
भारतीय राष्ट्रध्वज
संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह
विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच
यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
000000
No comments:
Post a Comment