जिल्ह्यातील हातमाग विणकराची माग तपासणी
नांदेड, दि. 5 :- केंद्र व राज्य
शासनाच्या विविध योजनेंतर्गत हातमाग विणकरांना अर्थसहाय्य दिले आहे. या सहकारी संस्था
चालू अथवा बंद आहेत याबाबत आढावा घेण्याच्या अनुषंगाने सन 2017-18 साठी जिल्ह्यातील हातमाग विणकरांची माग तपासणी 4 सप्टेंबर
ते 4 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
हातमाग विणकाराची माग तपासणी करण्यासंबंधी संचालक, (वस्त्रोद्योग),
नागपुर यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार या संस्थांची माग तपासणी
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड
यांनी नियुक्त केलेल्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हयातील सबंधित सर्व हातमाग
सहकारी संस्थांनी याची नोंद घेऊन तपासणी पथकास सहकार्य करावे. तसेच अधीक माहितीसाठी
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड
यांचे कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02462-284886 वर अथवा प्रत्यक्ष
कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment