Friday, August 4, 2017

खाजगी उपसा सिंचन परवानगीसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 :- कोल्हापुरी बंधारे, बॅरेजेस व कालवा नसलेले साठवण तलावातील पाणी वापरासाठी सर्व लाभधारकांनी 15 ते 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत उपसा सिंचन परवाने, मंजुरी प्रस्ताव, अर्ज सात-बारा व 8 अ उताऱ्यासह संबंधीत प्रकल्पांचे सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
उपसा सिंचनासाठी शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. प्रस्तावाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांची 5 सप्टेंबर रोजी शाखा कार्यालयात परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारितील कोल्हापुरी बंधारे, बॅरेजेस व कालवा नसलेले साठवण तलावात दरवर्षी जवळजवळ 100 टक्के पाणीसाठा निर्माण होत असतो. या पाणी साठ्याचा उपयोग लाभार्थ्यांनी स्वत: उपसा करुन घ्यावयाचा आहे. या पाणी वापरासाठी आवश्यक परवाने लाभार्थ्यांनी घेतले नसल्याचे दिसुन आले आहे. पाणी साठ्याचा पुरेपुर वापर होण्याच्या दृष्टिने सचिव (लाक्षेवि) यांचे सुचनेनुसार या प्रकल्पांवर शाखानिहाय शिबिराचे आयोजन करुन वैयक्तिक उपसा सिंचन परवाने, मंजुरी देण्याची कार्यवाही करण्याची मोहिम हती घेण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...