जिल्हा ग्रंथालय कार्यालयात
अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना आदरांजली
नांदेड दि. 2 :- लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन
व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय
नांदेड येथ त्यांना ग्रंथप्रदर्शनाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख
अतिथी म्हणून तहसीलदार महादेव किरवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची
उपस्थिती होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व
लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधीत असलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले
होते. त्याचे उदघाटन तहसीलदार श्री. किरवले यांचे हस्ते करण्यात आले. श्री. किरवले
यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे हे दोघेही ग्रंथप्रेमी, देशप्रेमी होते. यांनी भारतीय
साहित्यांमध्ये मोठी भर टाकली आहे. अण्णाभाऊच्या कांदबऱ्या, टिळकांचे चिंतन, संशोधनपर लिखाणामुळे या दोन्ही महान विभुती अमर आहेत, असे सांगितले
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुनील हुसे यांनी केले. सुत्रसंचालन प्रताप सुर्यवंशी तर आभार अजय
वट्टमवार यांनी मानले. अनेक विद्यार्थ्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
000000
No comments:
Post a Comment