पीक विमा भरण्यास
4 ऑगस्टची मुदतवाढ
नांदेड दि. 2 :- प्रधानमंत्री
पीक विमा
योजना खरीप हंगाम 2017 मध्ये 5 ऑगस्ट 2017 पर्यंत मुतदवाढीचा
शासन निर्णय अधिक्रमित करुन
राज्य शासनाने सुधारीत शासन
निर्णय निर्गमित केला आहे.
यानुसार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी
सहभागाची मुदतवाढ शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 करण्यात
आली आहे.
ही मुदत
वाढ केवळ बिगर कर्जदार
शेतकऱ्यांसाठीच असुन मुदतवाढीच्या कालावधी
दरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने
जनसुविधा केंद्राच्या माध्यमातुन
अथवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट
भरलेले अर्जच मान्य करण्यात
येणार असुन बँका विमा
प्रस्ताव घेऊ शकणार नाहीत.
ज्या शेतकऱ्यांनी
पीक विमा भरलेला नाही अशा
शेतकऱ्यांना विमा भरण्याचे अवाहन
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड
यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment