Friday, July 21, 2017

मतदार नोंदणीसाठी आज विशेष मोहीम
   सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार
            नांदेड दि. 21 :- जिल्‍ह्यातील सर्व 2 हजार 831 मतदान केंद्रावर शनिवार 22 जुलै 2017 रोजी विशेष शिबीर आयोजित करण्‍यात आल आहे. या केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाल आहेत अशा सर्व पात्र मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी अरुण डोंगरे  यांनी केले आहे.
             जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे दिनांक 31 जुलै 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे तसेच विहित नमुन्‍यातील प्रतिज्ञापत्र जोडूनच अर्ज करावेत.  तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा कराव.  त्रयस्‍त व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2017 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात 23 लाख 74 हजार 303 इतकी मतदार संख्‍या असून त्‍यापैकी 12 लाख 41 हजार 470 पुरुष 11 लाख 32 हजार 780 स्‍त्री व 53 इतर मतदार आहेत.
          
PVC EPIC चे वितरण
ज्‍या मतदारांनी दिनांक 5 जानेवारी 2017 नंतर ज्‍या मतदारांची नाव नोंदणी करण्‍यात आलेली आहे किंवा ज्‍यांनी दुरुस्‍तीबाबतचे अर्ज दिलेले आहे अशा एकूण 9 हजार 158  मतदारांना त्‍या-त्‍या मतदान केंद्रावर PVC EPIC (मतदान ओळखपत्र ) वाटप करण्‍यात येणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी विविध केंद्रांना भेट देणार
दिनांक 22 जुलै 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विशेष कॅम्‍पच्‍या अनुषंगाने मतदान नोंदणी अधिकारी तसेच सहा. मतदार नोंदणी अधिकारी हे विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.  यावेळी अनुपस्थित आढळून आलेल्‍या बीएलओ यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नांव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांनी यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविलेली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.
मयत / स्‍थलांतरित मतदारांची नावे वगळणे
मयत व्‍यक्‍तींची नावे मतदार यादीत असू नये या करीता मयत व्‍यक्‍तींच्‍या नातेवाईकांनी आवश्‍यक त्‍या पुराव्‍यासह मयतांची नावे मतदार यादीतून वगळण्‍यासाठी नमुना नं. 7 भरून दयावा, असेही आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...