Friday, July 21, 2017

कर्करोगाविषयी जनजागृती आवश्यक
- जयराज कारभारी
           नांदेड, दि. 21 :- कर्करोगाविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजगृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले. मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिननिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.   
जिल्हा रुग्णालयातील दंत शल्यचिकित्सक डॉ. रोशणी चव्हाण यांनी  विविध प्रकारच्या कर्करोगाबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय दर्शनी भागात तंबाखू मुक्त झाल्याबाबत फलक लावून कोटपा कायदाचे उलंघन होत असल्यास 1800 110 456 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) प्र. दे. यादमवार, सहाय्यक कामगार आयुक्त भास्कर मोराडे, डॉ. एस. डी. शिंदे, यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक  ए. एन. जाधव, आदी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...