बेटमोगरामध्ये “..चला गावाकडे जाऊ”
कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 31 :- अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या गावी जाऊन दोन
दिवस तेथील नागरिकांसह श्रमदान करावे. त्यात एक दिवस सुट्टीचा व एक दिवस
कार्यालयीन
असे नियोजन करावे असे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपविभागीय
अधिकारी नांदेड व तहसिलदार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदेड
येथील नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी बेटमोगरा या आपल्या गावी चला
गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा धरू हे अभियान 28 व 29 मे असे दोन दिवस
राबविले.
यात
पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता करण्यात आली. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धदयाळ शिवाचार्य यांच्या
हस्ते परिसर
स्वच्छता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांनी भौतिक स्वच्छतेसोबत मने ही
स्वच्छ ठेवा, एकीने गावाचा विकास करा असा संदेश गावकऱ्यांना दिला.
ग्रामसभेचे
आयोजन करून नागरिकांना जनकल्याण समृद्ध योजनेच्या 11 कलमी कार्यक्रमाची
माहिती तलाठी ग्रामसेवक
व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत देण्यात आली.
अॅड. उदय संगारेड्डीकर यांचे ग्रामविकासावर व्याख्यान आयोजन
करण्यात आले.
त्यांनी गावाचे
वैभव पुन्हा गावात आणण्यासाठी व गावाची अवकळा जाऊन समृद्ध गाव कसे होईल यावर
मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात सडा, रांगोळ्या टाकून समता
दिंडी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांचेसह संविधान व
ग्रामगीताचे पुजन करुन ग्रंथ डोक्यावर घेऊन समता दिंडी काढण्यात आली.
सरपंचामार्फत गांवकरी यांना स्वच्छता व विकासाची शपथ देण्यात आली. सातबाराचे चावडी वाचन झाले. गावकरी यांनी शंभर
झाडे लावून
जगविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात
सरपंच पद्मजा पाटील, पंचायत समिती उपसभापती व
महिलांसह गांवकरी ,प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवक गायकवाड, तलाठी कापसे, मुख्याध्यापक भैरवाडसह गांवकरी यांनी यासाठी
परिश्रम घेतले.
000000
No comments:
Post a Comment