Friday, May 12, 2017

दहावीच्या विद्यार्थ्यांचा
कलचाचणी अहवाल जाहीर
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2017 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची कलचाचणी 9 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत घेण्यात आली होती. या कलचाचणीचा कल अहवाल http://mahacareermitra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक नोंदवून कल अहवाल ऑनलाईन पहावा. हा कल अहवाल इयत्ता दहावीच्या गुणपत्रकाबरोबर छापील स्वरुपात देण्यात येणार आहे, अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  845 एफसीए अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न नांदेड दि. 13 ऑगस्ट :- विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी वनखात्याच्या जमिनी  ...