Friday, May 12, 2017

दहावी, बारावी परीक्षा निकालाच्या
दिनांकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  
नांदेड, दि. 12 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाच्या चुकीच्या व अनधिकृत तारखा व्हॉटस्ॲप व इतर सोशल मिडियावर परस्पर व अनधिकृतरित्या प्रसारीत करण्यात येत असलेल्या निकाल दिनांकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लातूर शिक्षण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या निकालाबाबत कोणत्याही तारखा मंडळाने जाहीर केल्या नाहीत. या परीक्षेच्या निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर रितसर प्रसार माध्यमांद्वारे निवेदन देऊन मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. व्हॉटस्ॲप व इतर सोशल मिडियावर परस्पर व अनधिकृतरित्या प्रसारीत करण्यात येत असलेल्या निकालाच्या दिनांकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...