स्वच्छता
अभियानातील कामगिरीसाठी
जिल्हाधिकारी
डोंगरे यांचा मुंबईत सत्कार
मोठ्या
राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल - मुख्यमंत्री फडणवीस
‘दरवाजा बंद अभियान’स प्रारंभ, हागणदारीमुक्त
11 जिल्ह्यांसह 33
ग्रामपंचायतींचा गौरव
मुंबई, दि. 30 - जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये हागणदारी
मुक्तीसाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहे. गेल्या वर्षभरात19 लाख
शौचालयांचे बांधकाम झाले असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी
हागणदारी मुक्त होईल,
असा विश्वास मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज येथे
व्यक्त केला. ‘दरवाजा बंद अभियान’चा प्रारंभ, तसेच हागणदारीमुक्त 11 जिल्हे
व 33 ग्रामपंचायतींच्या गौरवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री राजेंद्रसिंग तोमर, केंद्रीय
सचिव, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे,
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात नांदेडचे जिल्हाधिकारी
अरूण डोंगरे यांचा सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून
स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार
करण्यात आला. श्री. डोंगरे यांनी सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता अभियानातंर्गत विविध
नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले. ज्यामुळे वैयक्तीक तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या
घटकांबाबत जनजागृती करण्यात यश आले. सोलापूर जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायतीपैकी 467 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या. शौचालय बांधकामामध्ये सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकाविला. यात सन 2016-17 मध्ये शौचालय बांधकामाच्या 60 हजार 713 उद्दीष्टापैकी 31 मार्च 2017 पर्यंत 1
लाख 5 हजार 236 शौचालये बांधून 173.33 टक्के काम पूर्ण केले आहे. लोकसहभाग आणि विविध घटकांच्या
पुढाकारामुळे सोलापूर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीबाबत श्री. डोंगरे यांच्या
पुढाकारातून मोठे यश मिळाले.
मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उघड्यावर शौचाला प्रतिबंध व्हावा म्हणून ‘दरवाजा बंद’ हे अभियान सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्व अधिकारी
अतिशय मेहनतीने काम करीत असून राज्यात 1 वर्षात 19 लाख
शौचालये बांधण्यात आली आहे. राज्यात 35 टक्क्यांनी स्वच्छता वाढली आहे.
16 हजार गावे हागणदारी मुक्त झाली असून हे प्रमाण देशातील हागणदारीमुक्त
गावांच्या 18 टक्के आहे. मिशनमोडवर हे काम सुरु आहे. जी गावे हागणदारीमुक्त नाही तेथे जाऊन
ती हागणदारी मुक्त करण्याचे विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही मिशन देतोय. राज्यातील 250 शहरांपैकी 200 शहर हागणदारीमुक्त झाली असून
ऑक्टोबर 2017 पर्यंत सर्व शहर, तर 2018 मध्ये
सर्व महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल. असा
विश्वास व्यक्त करीत जनजागृतीसाठी
अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
000000
फोटो ओळी- ‘दरवाजा
बंद अभियान’चा प्रारंभ, तसेच हागणदारीमुक्त
जिल्हे व ग्रामपंचायतींच्या गौरवानिमित्त मुंबईत मंगळवार 30 मे रोजी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानमध्ये आयोजीत स्वच्छता
मेळाव्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांचा सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य
कार्यकारी अधिकारी म्हणून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,
प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री राजेंद्रसिंग तोमर, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर,
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन आदींचीही उपस्थिती होती.
000000
No comments:
Post a Comment