ग्रंथामुळे जीवनात समृद्धी - डॉ हंबर्डे
नांदेड दि. 24 :- शिक्षणाने मनुष्य शिक्षित होतो परंतु सुसंस्कृत होण्यासाठी
अवांतर व चौफेर वाचन गरजेचे आहे. ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होते. ग्रंथामुळे जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी
महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय येथे जागतिक ग्रंथदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी डॉ. श्रीकांत लव्हेकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथ विक्रेते सुधीर देबडवार, ज्ञानविश्व
साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के, जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुनील हुसे, मनपाचे ग्रंथपाल संजीव कार्ले, सेतू अभ्यासिकेचे ग्रंथपाल बाळू पावडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रंथराजच्या प्रतिकृतीचे पूजन मान्यवरांचे हस्ते झाल्यानंतर
ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुनील हुसे यांनी प्रस्ताविकातून जागतिक ग्रंथ दिनाचे महत्व व कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. डॉ.लव्हेकर यांनी उपस्थितांना वाचनाची गोडी लावून घेणं आवश्यक असल्याचे
सांगून ग्रंथाचे महत्व याविषयी माहिती दिली. याप्रसंगी निर्मलकुमार सूर्यवंशी व सुधीर देबडवार यांचीही समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वट्टमवार यांनी केले तर आभार मुक्तीराम
शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कोंडीबा गादेवार, सोपान येनगुलवाड, रघुवीर श्रीरामवार यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment